स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध — ऑनलाईन आणि ऑफलाईन तपासणीची सोय उपलब्ध..

0
New-Doc-10-12-2025-06.49.jpg

24 प्राईम न्यूज 12 Oct 2025

मुंबई, ९ ऑक्टोबर २०२५ — राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदार याद्यांची प्राथमिक यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली आहे. मतदारांना आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन तपासणीसाठी:
अधिकृत लिंक: https://mahasecvoterlist.in/
मतदार क्रमांक व नावाद्वारे नाव शोधण्याची सोय.
स्वतंत्र सुविधा: https://mahasec.maharashtra.gov.in/
१ जुलै २०२५ हा अर्हतादिनांक निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार विधानसभा मतदार यादीच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करण्यात आली आहे.
ऑफलाईन तपासणीसाठी:
जिल्हा परिषद व पंचायत समितींची यादी संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध.
नगरपरिषद व नगरपंचायत मतदार यादी त्यांच्या कार्यालयात पाहता येईल.
प्रति पाने शुल्क: ₹२
मतदार यादी डाउनलोड:
मतदारांना घरबसल्या यादी पाहता यावी यासाठी आयोगाने https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या लिंकवरून पीडीएफ स्वरूपात यादी डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे.
मतदारांनी आपले नाव प्राथमिक यादीत तपासून वेळेवर दुरुस्त्या अथवा आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 127000

22 Ct सोने 91.60% : ₹. 116300

18 Ct सोने 75.00% : ₹. 96500

शुद्ध चांदी 999%:₹. 1700/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed