महाराष्ट्राच्या अंतिम संघ निवड शिबिरासाठी जळगावचा पार्थ पाटील ची निवड..
24 प्राईम न्यूज 6 Oct 2025
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच विफा या महाराष्ट्र फुटबॉल बॉडीच्या माध्यमाने आंतर जिल्हा सब ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन शिरपूर येथे करण्यात आले होते.
३२ जिल्ह्याच्या स्पर्धेतून ४० खेळाडूंची निवड करण्यात आली होती त्यात जळगाव जिल्ह्याचा उदय स्पोर्ट्स अकॅडमी चा व विवेकानंद शाळेचा विद्यार्थी पार्थ चंद्रशेखर पाटील याची निवड झाली असून मुंबई येथे कुपरेज फुटबॉल ग्राउंड वर ६ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी त्याला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हा संघटनेचे सचिव फारुक शेख, संचालक ताहेर शेख व मुख्य प्रशिक्षक राहील अहमद यांची उपस्थिती होती.

