राज्यातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीची १०% हंगामी भाडेवाढ रद्द – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक..

0
New-Doc-10-02-2025-07.06.jpg

24 प्राईम न्यूज 2 Oct 2025


राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर आलेला आर्थिक ताण लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार एसटी महामंडळाची दिवाळी दरम्यानची १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात (१५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर) एसटी महामंडळाने १०% भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पूरस्थितीमुळे सर्वसामान्यांवर होणारा परिणाम विचारात घेऊन ही वाढ मागे घेण्यात आली आहे.

सरनाईक म्हणाले की, याअगोदर जाहीर केल्यानुसार साधी, हिरकणी, शयन आसनी, शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बस सेवांमध्ये भाडेवाढ होणार होती. पण आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे द्यावे लागणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळातही प्रवाशांना नेहमीच्या दरात तिकीट उपलब्ध होईल.

राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३०% पर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १०% दरवाढ करण्यात आली होती. मात्र राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हंगामी भाडेवाढ मागे घेऊन कोट्यवधी प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.

(अभिजीत भोसले – जनसंपर्क अधिकारी, मा.मंत्री परिवहन)

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 121000

22 Ct सोने 91.60% : ₹. 110800

18 Ct सोने 75.00% : ₹. 92000

शुद्ध चांदी 999%:₹. 1530/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed