रॉयल उर्दू ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल – जिल्हास्तरीय ग्रँड पुरस्काराने सन्मान..

0
New-Doc-09-28-2025-20.11.jpg


आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर रॉयल उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, अमळनेर यांनी या वर्षीचा निकाल शंभर टक्के लावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यंदा एकूण ८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कॉलेजचा लौकिक आणखी वाढला आहे.

या उत्कृष्ट यशाबद्दल कॉलेजला जिल्हास्तरीय ग्रँड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापनाचे पाठबळ यामुळे हे यश शक्य झाल्याचे कॉलेज प्रशासनाने सांगितले.

या यशामुळे रॉयल उर्दू ज्युनिअर कॉलेजचे नाव जिल्ह्यात अधिक उज्ज्वल झाले असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संस्थेच्या व्यवस्थापनाने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी शैक्षणिक वर्षातही यशाची परंपरा कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.


रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 117800

22 Ct सोने 91.60% : ₹. 107400

18 Ct सोने 75.00% : ₹. 89500

शुद्ध चांदी 999%:₹. 1470/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed