पिळोदे गावात प्रथमच आमरण उपोषणाची घोषणा : अनुकंपा नियुक्तीसाठी एका कुटुंबाचा संघर्ष..
आबिद शेख/अमळनेर

पिळोदे (ता. अमळनेर) : गावाच्या इतिहासात प्रथमच, अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पिळोदे येथील एक कुटुंब आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, म्हणजेच २ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर कुटुंबाने सांगितले की, घरातील कर्ता पुरुष कर्तव्यावर असताना मृत्यूमुखी पडले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदासाठी अर्ज करूनही गेल्या तीन-चार वर्षांपासून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. “मी नोकरीसाठी नकार दिला होता, असे ग्रामपंचायत म्हणते. पण जर नकार दिलाच असता, तर मी पुन्हा पुन्हा अर्ज का केले असते?” असा सवाल अर्जदाराने उपस्थित केला आहे.
त्यांच्या आरोपानुसार, रिक्त पद असूनही त्यांच्या अर्जाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या व्यक्तीस (भिला बापूराव संदानशिव) कामावर घेतल्याचा ठराव करण्यात आला. याशिवाय, गेल्या काही महिन्यांपासून एक अनोळखी व्यक्ती भूतपूर्व शिपाई म्हणून कार्यालयीन काम पाहत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर यांच्याकडून आलेल्या नोटीसकडेही ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप कुटुंबाने केला. त्यामुळेच नाईलाजाने उपोषणाचा निर्णय घ्यावा लागल्याचे अर्जदार आणि त्यांच्या आईने सांगितले.
या संदर्भात त्यांनी ग्रामपंचायतीला लेखी निवेदन सादर केले असून, योग्य कार्यवाही न झाल्यास गांधी जयंती दिनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 116800
22 Ct सोने 91.60% : ₹. 107400
18 Ct सोने 75.00% : ₹. 88700
शुद्ध चांदी 999%:₹. 1420/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
