अमळनेर नगरपरिषदेतर्फे पीएम सूर्या घर योजनेवर शिबिर. इंदिराभवन येथे २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ दरम्यान आयोजन
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – सेवापंधरवड्यानिमित्त अमळनेर नगरपरिषदेतर्फे पीएम सूर्या घर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत इंदिराभवन, स्वामीनारायण मंदिरामागे, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे.
या शिबिरात नामांकित सोलर विक्रेत्यांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळणार असून, घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती दिली जाणार आहे. यासोबतच सोलर बसविण्यासाठी कर्जपुरवठा सुविधेबाबत माहिती देण्यासाठी विविध बँकांचे प्रतिनिधीही शिबिरात उपस्थित राहणार आहेत.
नगरपरिषदेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, या शिबिरास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पीएम सूर्या घर योजनेचा लाभ घ्यावा.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117500
22 Ct सोने 91.60% : ₹. 108000
18 Ct सोने 75.00% : ₹. 89300
शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
