कासोदा ग्रामपंचायतीत शिक्षक भरतीसाठी निवेदन सादर : पवित्र पोर्टल सुरू करून रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी..
आबिद शेख/अमळनेर

कासोदा (ता. एरंडोल, जि. जळगाव) दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी कासोदा ग्रामपंचायतीला शिक्षक भरतीसंदर्भात निवेदन देण्यात आले. हे निवेदन मोईन खान महमूद खान, शेख दानिश सलीम, दानिश खान आबिद खान तसेच माजी उपसरपंच मुख्तार सर यांच्या वतीने सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्य शासनाने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया त्वरित सुरू करावी. प्रत्येक नियुक्त शिक्षकाकडे डी.एड./बी.एड. व TET/CTET उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे बंधनकारक करावे. याशिवाय किमान पदवीधर किंवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सर्व नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने पवित्र पोर्टलमार्फतच करण्यात याव्यात, यावर भर देण्यात आला. गावातील मुलांना गुणवत्तापूर्ण, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षण मिळावे, तसेच प्रत्येक वर्गखोलीत पात्र व सक्षम शिक्षक असावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच TAIT उत्तीर्ण उमेदवारांना न्याय मिळावा आणि शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 117500
22 Ct सोने 91.60% : ₹. 108000
18 Ct सोने 75.00% : ₹. 89300
शुद्ध चांदी 999%:₹. 1390/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
