खासदार महोत्सवात फुटबॉलचा समावेश करावा – फारुक शेख यांची क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना मागणी..
24 प्राईम न्यूज 13 Sep 2025
खासदार महोत्सवाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये फुटबॉल या खेळाचा समावेश न झाल्याने जळगाव जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडू, संघटक व क्रीडाप्रेमी यामध्ये नाराजीची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावचे ज्येष्ठ क्रीडासंघटक व फुटबॉलचे कार्यकारी संचालक (आमंत्रित) WIFA, मुंबई फारुक शेख अब्दुल्ला यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना निवेदन देत तातडीने फुटबॉलचा समावेश करावा अशी मागणी केली आहे.

शेख यांनी नमूद केले की,
जळगाव जिल्ह्यात शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठीन तसेच खुल्या गटातील क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक संघ फुटबॉलचे असतात. तरीदेखील महोत्सवात फुटबॉलचा समावेश न करणे हा खेळाडूंवरील अन्याय असून चुकीच्या माहितीच्या आधारे हा निर्णय झाल्याचे दिसते.
ते पुढे म्हणाले की, आयोजकांकडून निवडलेल्या काही खेळांविषयी व समन्वयकांविषयीही अचूक माहिती मंत्र्यांना मिळालेली नसावी. “आपल्या समोर मी कागदोपत्री पुरावे सादर करण्यास तयार आहे. चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना समक्ष उपस्थित करून सत्यासमोर आणले पाहिजे. अन्यथा यात राजकारणाशिवाय इतर काही घडत असल्याचा संशय निर्माण होईल,” असा इशारा शेख यांनी दिला आहे.
फारुक शेख हे फुटबॉल, हॉकी, स्विमिंग, पॅराऑलिम्पिक, टेबल टेनिस, बुद्धिबळ अशा विविध क्रीडा संघटनांमध्ये पदाधिकारी असून २५ वर्षे जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शासनाचे क्रीडा संघटक पुरस्कार, शिवाय ६४ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. शिवछत्रपती पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता; परंतु जातीयवादी संघटनांच्या तक्रारीमुळे तो स्थगित झाला असून सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 113000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1320/-
🎂
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
