शालेय फुटबॉल स्पर्धा२५ वर्षा नंतर मिल्लत हायस्कूल ने पटकाविले विजेतेपद स्पर्धेतील सर्वत्कृष्ट खेळाडू सैफ शेख..

0
New-Doc-09-12-2025-07.03.jpg

24 प्राईम न्यूज 12 Sep 2025


जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर शालेय मनपा व उर्वरित फुटबॉल स्पर्धा चे आयोजन गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज फुटबॉल मैदान जळगाव येथे करण्यात आले असून गुरुवारी १७ वर्षातील मनपा स्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या त्यात मिल्लत हायस्कूल २५ वर्षा नंतर विजयी ठरली. एल एच पाटील उपविजेती तर तृतीय स्थानावर ओरियन सीबीएससी ला समाधान मानावे लागले.

या पूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिल्लत हायस्कूल चा गोलकीपर सैफ शेख याला देण्यात आला

स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाला डॉक्टर अण्णासाहेब जीडी बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, हुफ्फाझ फाउंडेशनचे अध्यक्ष हाफिज रहीम पटेल, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले व ममता प्रजापत तसेच राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वसीम रियाज, तौसिफ शेख, राहील अहमद, वसीम चांद, पंकज तिवारी, उदय फालक यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल

1) गोदावरी सीबीएसई विरुद्ध इकरा शाहीन २-१
२) एल. एच .पाटील स्कूल विरुद्ध सेंट जोसेफ स्कूल २-१
३) रायसोनी मराठी स्कूल विरुद्ध सेंट लॉरेन्स स्कूल १-०
४) ओरियान स्टेट बोर्ड स्कूल विरुद्ध प्रगती विद्या मंदिर स्कूल २-०
५) विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल विरुद्ध इकरा सालार नगर २-०
६) ओरियान सीबीएसई विरुद्ध ए. टी. झांबरे स्कूल पेनल्टी ५-४
७) मिल्लत हायस्कूल विरुद्ध सेंट टेरेस पेनल्टी ५-४
८) रायसोनी इंग्लिश स्कूल विरुद्ध अँग्लो उर्दू स्कूल ५-३
९) गोदावरी सीबीएसई विरुद्ध रायसोनी इंग्लिश स्कूल पेनॉल्टी ३-२
१०) एल. एच .पाटील स्कूल विरुद्ध. ओरियान स्टेट बोर्ड स्कूल १-०
११) ओरियान सीबीएसई विरुद्ध रायसोनी मराठी स्कूल १-०
१२) मिल्लत हायस्कूल विरुद्ध विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल १-०

सेमी फायनल

१३) एल. एच .पाटील स्कूल विरुद्ध गोदावरी सीबीएसई पेनल्टी ४-२
१४) मिल्लत हायस्कूल विरुद्ध ओरियान सीबीएसई पेनल्टी ,५-३
१५) मिल्लत विजयी विरुद्ध एल एच पाटील २:०

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 112500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 10350/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 85500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1290/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed