शालेय मनपा फुटबॉल क्रीडा स्पर्धा पोदार, एम जे व डी एल हिंदी विजयी..

24 प्राईम न्यूज 10 Sep 2025
जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व गोदावरी फाउंडेशनच्या सहकार्याने जळगाव जिल्हा अंतर शालेय मनापा व जिल्हास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेला गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजला सुरवात झाली आहे.
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी फुटबॉल ला किक मारून व नाणे फेक करून स्पर्धेचे उद्घाटन केले.
स्पर्धेतील विजयी व उपविजय संघाला फुटबॉल संघटना व स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे चषक व मेडल देण्यात आले.
या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील, संघटनेचे सचिव फारूक शेख, ग्लोबल न्यूज चे संचालक मतीन पटेल, संघटनेचे संचालक तथा स्पोर्ट्स हाऊस चे मालक अँड. अमीर शेख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे फारुक शेख जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सुरेश तारकुडे सह संघटनेचे पदाधिकारी, पंच व खेळाडू प्रयत्नशील आहे
मंगळवारी झालेल्या स्पर्धेचा अंतिम निकाल
१४ वर्षांतील मुली ( मनपा)
विजयी. = पोदार इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव
उपविजयी = गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव
तृतीय = ए . टी . झांबरे स्कूल जळगाव
१९ वर्षांतील मुले ( मनपा)
विजयी. = स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्याल जळगाव
उपविजयी = इकरा शाहीन ज्युनिअर कॉलेज जळगाव
तृतीय = अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेज जळगाव
१९ वर्षातील मुले ( उर्वरीत)
विजयी. = डी. एल. हिंदी ज्युनिअर कॉलेज भुसावळ
उपविजयी = जी.एच. रायसोनी ज्युनिअर कॉलेज जळगाव.
स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून वसीम रियाज, तौसिफ शेख, वसीम चांद, साबीर शेख, हिमाली बोरोले, ममता प्रजापत, अमृता चौधरी, संस्कृती मेढे, अमिन शेख, उदय फालक आदि परिश्रम घेत आहे.
