पारोळा तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गजानन विद्यालय, राजवड (आदर्शगाव) प्रथम..

0
New-Doc-09-03-2025-10.04.jpg

आबिद शेख/अमळनेर


पारोळा :एन.ई.एस. गर्ल्स हायस्कूल येथे दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पारोळा तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत गजानन माध्यमिक विद्यालय, राजवड (आदर्शगाव) या शाळेच्या 17 वर्षीय मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 17 शालेय मुलींच्या संघांनी सहभाग घेतला होता.

अंतिम सामन्यात गजानन विद्यालय, राजवडच्या मुलींनी उत्कृष्ट खेळ सादर करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर राजवड शाळेला तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त झाला.

विजयी संघाला गजानन विद्यालयाचे गणित विषयाचे शिक्षक गोवर्धन बागुले सरांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष व आमदार दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा व अमळनेर नगराध्यक्ष ताईसाहेब जिजामाता कृषीभूषण पुष्पलता पाटील, सचिव लोटन देसले, संचालक मंडळ, मुख्याध्यापक योगेश सूर्यवंशी सर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजवड, खेडीढोक व दगडी सबगव्हाण ग्रामस्थांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.

सदर विजयानंतर आता या विद्यार्थिनी जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी होणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 98100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed