मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण संपुष्टात : सरकारकडून हैदराबाद गॅझेटिअर अंमलबजावणीचा निर्णय..

0
New-Doc-09-03-2025-10.19.jpg

24 प्राईम न्यूज 3 Sep 2025


मुंबई :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण मंगळवारी (२ सप्टेंबर) सायंकाळी पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. हैदराबाद गॅझेटिअरची तात्काळ अंमलबजावणी व सातारा संस्थान गॅझेटिअरमधील कायदेशीर त्रुटी दूर करून महिनाभरात शासन निर्णय काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सदस्यांसह आझाद मैदानात जाऊन जरांगे यांची भेट घेतली व शासनाचे निर्णयपत्र वाचून दाखवले. उपस्थित अभ्यासक, वकील आणि मराठा बांधवांकडून जाहीर सहमती घेतल्यानंतर शासन निर्णय जरांगे यांना सुपूर्द करण्यात आला.

सरकारने आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य करत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत व नोकरी, जातप्रमाणपत्रांसाठी त्रिसदस्यीय समिती, ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावणे, जातपडताळणी ९० दिवसांत पूर्ण करणे आणि न्या. संदीप शिंदे समितीचे काम सुरू ठेवणे अशा निर्णयांची घोषणा केली.

यानंतर जरांगे यांनी विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी प्राशन करून उपोषणाची सांगता केली. या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला तर सरकारनेही सुटकेचा निश्वास सोडला.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 98100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed