अमळनेरात मुलानेच केला पित्याचा खून; शिवाजीनगर शिरूड नाका परिसरातील धक्कादायक घटना..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील शिवाजीनगर शिरूड नाका येथे रविवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र दत्तात्रय कासार (वय ६४) यांचा त्यांच्या मुलानेच भूषण उर्फ( मोन्या) याने खून केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कासार व त्यांचा मुलगा दोघांनीही दारूचे सेवन केले होते. दरम्यान वाद वाढल्याने मुलानेच पित्याचा जीव घेतल्याची माहिती मिळत आहे. घटनेच्या वेळी मुलाची आई बाहेरगावी गेलेली होती.
खून झाल्याची माहिती मिळताच अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
