श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यासाठी अमळनेर सज्ज; भक्तिमय वातावरणात वाहणार श्रद्धेचा महापूर..

0
New-Doc-09-01-2025-22.27.jpg

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर येथे दरवर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला श्री मंगळग्रह देवाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा २०२५ हे मंगळग्रहाच्या प्रभावाचे वर्ष असल्याने अमळनेरात श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळा भव्य व दिव्य स्वरूपात होत आहे. २९ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी महाभोमयाग, कलशारोहण व नवकुंडी विशेष शांती पार पडली. आता २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासोहळ्यासाठी संपूर्ण अमळनेर नगरी भक्तिमय व चैतन्यमय वातावरणाने सज्ज झाली आहे.

शहरभर स्वागत कमानी, फलक व सजावट करण्यात आली असून सेवाभावी संस्था, संघटना, महिला मंडळे, स्वयंसेवक, तसेच अनिरुद्ध बापूंची डिझास्टर मॅनेजमेंट टीम यांच्यासह मंदिर सेवेकरी कार्यरत आहेत. खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन अंतिम टप्प्यात आले आहे.

महासोहळ्याचे प्रमुख नियोजन

२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ ते ७ दरम्यान श्री मंगळ महाविशेष अभिषेक, पंचामृत महाभिषेक, नूतन ध्वजारोहण, ५६ भोगार्पण व महाआरती पार पडणार आहे. सकाळी ५ वाजता महाआरतीनंतर दिवसभर विविध बॅचच्या माध्यमातून अभिषेक व हवनात्मक शांतीपूजा सुरू राहतील.

“सातासमुद्रापार पोहोचेल महासोहळा” – अशोक जैन

“२७ वर्षांनी लाभलेला हा मंगलयोग अमळनेर नगरीसाठी ऐतिहासिक आहे. समाजातील सर्व घटकांच्या सामूहिक सहभागामुळे हा महासोहळा यशस्वी होईल आणि अमळनेर तसेच खानदेशचे नाव सातासमुद्रापार पोहोचल्याशिवाय राहणार नाही,” असे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, शरद सोनवणे, प्रवीण गोसावी, तिलोत्तमा पाटील, गणेश भामरे, करुणा सोनार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1270/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed