यावल तालुक्यात धक्कादायक घटना : २१ वर्षीय तरुणाचा खून, आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली..
24 प्राईम न्यूज 31 Aug 2025

यावल तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर २१ वर्षीय इमरान युनूस पटेल या तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना २९ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इमरान पटेल हा मूळचा धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा गावचा रहिवासी असून सध्या तो मामाकडे दहिगाव येथे वास्तव्यास होता. खिरवा गावाजवळ त्याची हत्या करण्यात आली.
विशेष म्हणजे, या खुनातील संशयित आरोपी ज्ञानेश्वर गजानन पाटील (१९) आणि गजानन रवींद्र कोळी (१९) हे थेट मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात हजर झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात खुनांच्या घटना वाढल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अवघ्या २० दिवसांपूर्वी जामनेर तालुक्यातही अशीच घटना घडली होती. त्यामुळे “गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरलेला नाही” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
सध्या यावल पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून खुनामागील नेमके कारण समोर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 105600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 97150/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 80200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1240/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
