ऊर्दू माध्यमातूनही मिळवता येते UPSC मध्ये यश – डॉ. करीम सालार..

0
New-Doc-08-28-2025-10.35.jpg


नंदुरबार /प्रतिनिधी
शिमला ग्रुप व तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन UPSC मोटिवेशनल व करिअर गायडन्स कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी UPSC परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडूंचा सत्कार व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव चेअरमन डॉ. अब्दुल करीम सालार यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितांमध्ये इकरा कॉलेज जळगाव प्राचार्य डॉ. हारुन बशीर, प्रा. अब्दुल कय्युम नादरशाह, प्रा. डॉ. वकार सर, जमियत सेक्रेटरी नंदुरबार मुफ्ती शाहरुख, हाफीज अखलाक, डॉ. जमील मन्सुरी यांच्यासह मान्यवरांचा सहभाग होता.

डॉ. अब्दुल करीम सालार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “मातृभाषेतूनसुद्धा UPSC परीक्षा देऊन मोठ्या पदांवर पोहोचता येते. माध्यमिक शाळेपासून तयारी केली तर वयाच्या 20-22 व्या वर्षीच यश मिळवता येऊ शकते.”
डॉ. हारुन बशीर यांनी अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि योग्य मार्गदर्शन यावर भर देत हमखास यश मिळू शकते असे सांगितले.

कार्यक्रमात अलफैज फाऊंडेशन जळगावतर्फे UPSC परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडूंचाही सत्कार झाला.

कार्यक्रमाचे संयोजन जावेद बागवान यांनी केले. सूत्रसंचालन हैदर जाफर यांनी केले तर आभारप्रदर्शन साबीर कुरेशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक खलील शेख, अरशद कुरेशी, खाटीक इमरान, सुफीयान काझी, हमजा मन्सुरी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed