धुलिया : 15-16 वर्षांच्या तरुणांची सुलेमान खान मॉब लिंचिंगविरोधात धडाडती तर्जुमानी

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडलेल्या सुलेमान खान यांच्या मॉब लिंचिंग घटनेच्या निषेधार्थ आज धुलिया येथे मायनॉरिटी राईट फेडरेशनतर्फे निषेध कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाची खासियत म्हणजे धुलिया शहरातील केवळ 15 ते 16 वर्ष वयोगटातील तरुणांनी संपूर्ण तर्जुमानी केली. प्रशासनास निवेदन देऊन त्यांनी स्पष्ट संदेश दिला की मुस्लिम समाजातील लहानग्यांपासून प्रत्येक जण जागरूक आहे व आपल्या हक्कांसाठी कोणत्याही आधाराशिवाय लढण्याची ताकद त्यांच्यात आहे.

आज पोळा सणाची सार्वजनिक सुट्टी असतानाही प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले. विशेष म्हणजे निवेदन सादर करण्यासाठी फक्त हेच तरुण पुढे सरसावले होते.

या प्रसंगी धुलिया शहरातील निडर जनता व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed