इर्शाद भाई जागिरदार यांचा शिक्षणासाठी मदतीचा हात – अनुष्का पवार हिला लॅपटॉप भेट..
24 प्राईम न्यूज 21 Aug 2025
पुणे : इर्शाद भाई जागिरदार यांनी शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करत पुण्यातील त्यांच्या जुने सहकारी श्री. चंद्रकांत (बंटी) पवार यांची मुलगी अनुष्का चंद्रकांत पवार हिला नवीन लॅपटॉप सुपूर्द केला.
अनुष्का ही CA (Chartered Accountant) चा अभ्यास करीत असून पुढील शिक्षणासाठी तिला लॅपटॉपची आवश्यकता होती. साधारण कुटुंबातील असल्याने शिक्षणाचा वाढता खर्च पेलण्यास अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन इर्शाद भाई यांनी स्वतः पुढाकार घेत अनुष्का हिला नवीन लॅपटॉप भेट दिला.
“एका साधारण कुटुंबातील मुलगी चांगले शिक्षण घेऊन प्रगती करेल तसेच आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलण्यास मदत होईल, या प्रामाणिक हेतूने मी ही मदत केली,” असे इर्शाद भाई यांनी यावेळी सांगितले.
अनुष्काच्या चेहऱ्यावर आनंद पाहून इर्शाद भाईंच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
