ब्रह्माकुमारिज फरांदे पार्क तर्फे संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन उत्सव..
24 प्राईम न्यूज 21 Aug 2025

नांदेड – फरांदे पार्क ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने मालेगाव रोडवरील संध्याछाया वृद्धाश्रमात रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी अनिता दिदी यांनी आश्रमातील मातांच्या हातावर ईश्वरीय राखी बांधून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच ईश्वरीय सौगातही प्रदान केली. दिदींनी प्रास्ताविक करून रक्षाबंधनाचा अध्यात्मिक अर्थ समजावून सांगितला.
कार्यक्रमादरम्यान आश्रमाचे व्यवस्थापक विक्रमजी टरकेपाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भावनिक व अध्यात्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यात जोगदंड भाई, जोगदंड माताजी, शिवलीला बहन व सुरेखा बहन यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
रक्षाबंधन कार्यक्रमास आश्रमातील सुमारे ४० ते ५० माता उपस्थित होत्या.
