खुर्चीत बसून गाणारा तहसीलदार निलंबित, आंदोलकाच्या कमरेत उडी मारणारा DySP मात्र कायम – व्यवस्थेतील दुटप्पीपणा उघड.

0
New-Doc-08-20-2025-20.40.jpg


24 प्राईम न्यूज 24 Aug 2025

सरकारच्या कारवाईतील दुहेरी निकषांवर प्रश्नचिन्ह अलीकडे दोन वेगळ्या घटना घडल्या असून त्यातून प्रशासनाच्या कारभारातील स्पष्ट दुटप्पीपणा उघड झाला आहे एका अधिकृत कार्यक्रमात खुर्चीत बसून गाणे म्हटल्याबद्दल तहसीलदार थोरात यांच्यावर तातडीने कारवाई करत सरकारने निलंबनाची गाजरगाठ लावली. माध्यमांमध्ये प्रकरण चांगलेच गाजल्यानंतर शासनाने झटपट पाऊल उचलले.

याउलट, आंदोलकांवर कारवाई करताना DySP कुळकर्णी यांनी अक्षरशः आंदोलकाच्या कमरेत उडी मारत लाथ घातल्याचा धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आला. या घटनेचे व्हिडिओ-फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून मानवी हक्कांची उघड पायमल्ली झाली आहे. तरीदेखील, संबंधित अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

दुहेरी निकषांवर जनतेचे प्रश्न

खुर्चीत बसून गाणे म्हटल्यामुळे तहसीलदार निलंबित, मग आंदोलकावर उघडपणे हिंसाचार करणारा पोलीस अधिकारी का कायम? सामान्य अधिकाऱ्यांवर तातडीची कारवाई, पण सत्ताधाऱ्यांचे रक्षण करणाऱ्यांना मोकळीक का? आंदोलकांवर लाठीमार करून लोकशाही वाचते की फक्त सत्तेची खुर्ची? संविधानाचा अपमान की पेशवाईचे पुनरागमन?

भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचा अधिकार देते. पण प्रशासन जर दोन वेगवेगळे मापदंड वापरणार असेल – एक साध्या शासकीय अधिकाऱ्यासाठी आणि दुसरा सत्तेचे रक्षण करणाऱ्यासाठी – तर ते लोकशाही नसून अन्यायकारी ‘पेशवाई’ आहे, अशी भावना जनतेत निर्माण होत आहे.

सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित DySP वर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा, जनता स्वतःच याचा निकाल देईल, असा इशारा दिला जात आहे.

लोकशाहीत “सत्ता जनतेकडून येते”, पण आजच्या घडामोडींवरून “सत्ता अन्यायातून येते” असे चित्र दिसत आहे.
हीच खरी पेशवाई..!


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed