बेटावद मॉबलिंचिंग प्रकरणात मुख्य आरोपी अजूनही मोकाट;                                        मकोका लागू करावा, तपासी अधिकारी बदलावा – अजित दादांकडे एकता संघटनेची मागणी.

0
New-Doc-08-18-2025-06.25.jpg


24 प्राईम न्यूज 18 Aug 2025
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे झालेल्या मॉबलिंचिंग प्रकरणाला सहा दिवस उलटून गेले तरीही मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट असून, पोलिसांकडून त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली असली, तरी प्रत्यक्ष सहभागी असलेला व एका संघटनेशी संलग्न तसेच स्थानिक राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असलेला मुख्य आरोपी अद्यापही अटकेबाहेर आहे. घटनास्थळावरील असंख्य साक्षीदारांचे जबाब, पुरावे आणि पीडित कुटुंबीयांची तक्रार असतानाही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भारतीय दंड संहिता कलम ६१(२) (गुन्हेगारी कट) आणि मकोका लागू करण्यासही टाळाटाळ होत असल्याचे निदर्शनास आले.
एकता संघटनेच्या मागण्या
जळगाव जिल्हा एकता संघटनेने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन लेखी तक्रार सादर केली. त्यात पुढील मागण्या करण्यात आल्या –. 1. एसआयटी मधून तपासी अधिकारी पी. आय. मुरलीधर कासार यांना हटवून डीवायएसपी दर्जाचा अधिकारी नेमावा.

  1. मुख्य सूत्रधारास तातडीने अटक करावी.
  2. प्रकरणात कलम ६१(२) व मकोका लागू करावा.
  3. पीडित कुटुंबाला संरक्षण व न्याय मिळवून द्यावा.
  4. पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत व सरकारी नोकरी द्यावी.
  5. विशेष सरकारी वकील नेमून खटला वेगाने चालवावा.
    या शिष्टमंडळाशी चर्चा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फारुक शेख यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांनी पोलिस अधीक्षक जळगाव यांच्याशी बोलण्याचे तसेच तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे चौकशीसाठी देण्याचे आश्वासन दिले. “ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे,” असेही ते म्हणाले.
    या शिष्टमंडळात मुफ्ती खालिद, फारूक शेख, नदीम मलिक, फिरोज शेख, कासिम उमर, जावेद मुल्ला, आसिफ शेख, शाहबाज खान, शकील शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना कासिम नदवी, मौलाना गुफरान, मतीन पटेल, अनवर शिकलगर, अ‍ॅड. आवेश शेख, नजमुद्दीन शेख, साबिर खान, शब्बीर खान, अमजद पिंजारी, शेख फिरोज तसेच धुळे, नंदुरबार व जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed