पातोंडा व नांद्री गावातील पारधी वस्त्यांतील पूरग्रस्तांना शाळा व भवनात सुरक्षित आसरा.
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील पातोंडा आणि नांद्री गावातील पारधी वस्त्यांमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पातोंडा येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच नांद्री गावातील स्थानिक भवनात या पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला आहे.
पूरग्रस्तांना खिचडी व चहा, पिण्याचे पाणी तसेच बिछायतची सोय प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थांनी करून दिली. सद्यस्थितीत पूर परिस्थिती निवळली असली तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने पातोंडा येथील पारधी वाड्यातील ग्रामस्थांना शाळेतच थांबण्याचे व नांद्रीतील ग्रामस्थांना भवनातच राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हे मदत कार्य प्रांताधिकारी नितीकुमार मुंडावरे व तहसिलदार रूपेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल सहाय्यक अनिल चौधरी व प्रदीप महाले, पातोंडा तलाठी पवनकुमार शिंगारे तसेच नांद्रीचे तलाठी किरण महाजन यांच्या उपस्थितीत व गावकऱ्यांच्या सहकार्याने पार पडले.
