७५० विद्यार्थ्यांकडून ‘पसायदान’ सादरीकरण – पिंपळे बु. आश्रमशाळेत आगळावेगळा उपक्रम..

0
New-Doc-08-15-2025-07.22.jpg


आबिद शेख/अमळनेर


दि. १४ ऑगस्ट २०२५, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु. अ. पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. येथे एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

या वेळी महाराष्ट्राचे संतशिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५०) जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले ‘पसायदान’ ७५० विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कोमल आणि मधुर आवाजातील पसायदानाने उपस्थितांचे मन भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाली. परिपाठ समिती सदस्य व उच्च माध्यमिक शिक्षक श्री. स्वप्नील एल. पाटील यांनी पसायदानाचे महत्त्व स्पष्ट केले. “पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वकल्याणाचे तत्त्वज्ञान आहे,” असे ते म्हणाले. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी एकसूरात पसायदान सादर करताना सकारात्मक ऊर्जा आणि निरागस भाव प्रकट केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. अविनाश अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. उदय पाटील यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

या अनोख्या उपक्रमाचे चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटीचे सचिव नानासो श्री. युवराज पाटील, अध्यक्षा श्रीमती विद्याताई पाटील, प्रकल्प अधिकारी मा. श्री. अरुण पवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) मा. श्री. पवनकुमार पाटील यांनी कौतुक केले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed