१०,०००/- लाच स्वीकारताना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे रंगेहात अटकेत

0
New-Doc-08-13-2025-08.30.jpg

24 प्राईम न्यूज 13 Aug 2025


धुळे, दि.१२ ऑगस्ट २०२५ : जिल्हा परिषदेच्या चांदे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकाकडून १०,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती धुळे येथील शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. सदर कारवाई आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी केली असून, आरोपी विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

तक्रारदार हे चांदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे सध्या मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नांद्रे यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे कारण देत वरिष्ठांकडे प्रतिकूल अहवाल न पाठवण्याच्या मोबदल्यात तसेच शाळेला मिळालेल्या समग्र शिक्षा योजनेच्या अनुदानासाठी १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम त्यांनी स्वतःसाठी व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांच्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.

तक्रारदाराने ही माहिती तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे दि.११ ऑगस्ट रोजी दिली. त्यानुसार त्या दिवशी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपीने लाचेची मागणी स्पष्टपणे मान्य केली.

यानंतर, आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी सापळा रचण्यात आला. त्यानुसार, श्रीमती रोहिणी नांद्रे यांनी त्यांच्या कार्यालयात तक्रारदाराकडून १०,०००/- रुपये लाच स्वीकारली. त्याच वेळी त्यांना रंगेहात अटक करण्यात आली.

ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल व त्यांचे सहकारी राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, सागर शिर्के, प्रितेश चौधरी व रेश्मा परदेशी यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed