प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीच्या जागतिक प्रतिष्ठित अभ्यागत कार्यक्रमात निवड. संगणक व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मानाचा टिळा
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील रहिवाशी आणि मुंबईतील एट्लस तंत्रकौशल्य विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा संचालक प्रा. डॉ. शशिकांत पाटील यांची आय ट्रिपल ई (IEEE) कम्प्युटर सोसायटीच्या डिस्टिंग्युशड व्हिजिटर प्रोग्राम २०२५ (Distinguished Visitor Program) मध्ये निवड झाली आहे. हा कार्यक्रम संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक पातळीवरील एक अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीकडून मिळालेल्या अधिकृत पत्रानुसार, १४० हून अधिक नामांकित तंत्रज्ञांमधून केवळ २० जणांची निवड यावर्षी करण्यात आली असून, डॉ. पाटील यांचा त्यात समावेश हे त्यांचे जागतिक स्तरावरील तांत्रिक योगदान अधोरेखित करणारे आहे.
डिस्टिंग्युशड व्हिजिटर प्रोग्राम म्हणजे काय?
IEEE कम्प्युटर सोसायटीचा हा विशेष कार्यक्रम जगभरातील उत्कृष्ट तंत्रज्ञ, व्याख्याते आणि संशोधक यांना विविध देशांतील विद्यापीठे, औद्योगिक संस्था व विद्यार्थी गटांशी जोडतो. या कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाइन सादरीकरण व ज्ञानसत्रे आयोजित केली जातात प्रत्यक्ष भेटी घेऊन तांत्रिक चर्चासत्रे होतात नवीनतम तंत्रज्ञानविषयक बदलांवर लक्ष केंद्रित केले जाते
डॉ. पाटील यांचे योगदान आणि सन्मान
डॉ. शशिकांत पाटील हे संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता व नवोपक्रम क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. या सन्मानाच्या अनुषंगाने त्यांना:
विशेष डिस्टिंग्युशड व्हिजिटर कॉईन (नाणे)अधिकृत नियुक्ती प्रमाणपत्र. IEEE अध्यायांकडून व्याख्यानांची आमंत्रणे. व्याख्यान आयोजनासाठी $१५०० पर्यंत अनुदान. या स्वरूपात सन्मानित केले जाणार आहे. भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गौरवाची बाब. या निवडीमुळे डॉ. पाटील यांना **जगभरातील IEEE च्या विविध शाखांमध्ये व्याख्याने करू शकतील. त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव नवीन पिढीच्या तंत्रज्ञांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल. आय ट्रिपल ई कम्प्युटर सोसायटीने डॉ. पाटील यांचे अभिनंदन करत असे म्हटले आहे की, त्यांच्यासारख्या तंत्रज्ञानप्रेमी अन व्यासंगी व्यक्तींमुळेच समुदायाची प्रगती होत राहते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
