अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा शतक महोत्सवी वर्षानिमित्त भव्य गौरव समारंभ..

0
New-Doc-08-11-2025-06.22.jpg


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर को.ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब-गरजू रुग्णांसाठी आरोग्य साधनांचे लोकार्पण व सभासद पाल्यांचा भव्य गौरव समारंभ, बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इंदिरा भवन येथे उत्साहात संपन्न झाला. या वेळी संचालक मंडळाचा अभिनंदन ठराव तसेच ९ टक्क्यांऐवजी १० टक्के लाभांश देण्याचा ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केला.

सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे होते. व्यवस्थापक अमृत पाटील यांनी प्रास्ताविकातून शतक महोत्सवी वर्षात राबवलेल्या महत्त्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. यात सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेला सभासद-ग्राहक मेळावा, समग्र आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, बँकेच्या इमारतीचे नूतनीकरण, नव्या आर्थिक योजना आणि “अमृत धनसंचय १००” योजनेचा विशेष उल्लेख करण्यात आला.

शतक महोत्सवी वर्षानिमित्त गरीब व गरजू रुग्णांसाठी मेडिकल बेड, अपंग व्हीलचेअर, वॉकर, वॉटर बेड आदी आरोग्य साधनांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच १०वी व १२वी परीक्षेत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सभासदांच्या पाल्यांचा गौरव भेटवस्तू देवून ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जेष्ठ संचालक पंडित चौधरी, प्रविण जैन, मोहन सातपुते, भरत ललवाणी, लक्ष्मण महाजन, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, ॲड. व्ही.आर. पाटील, ॲड. विजय बोरसे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सभासदांनी शाखा विस्तार, विशेष भेटवस्तू वितरण यासह विविध सूचना सभेत मांडल्या. प्रारंभी बँकेच्या दिवंगत सभासदांसह माजी चेअरमन स्व. गोविंद मुंदडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वसाधारण सभेच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed