राहुल सोलापूरकरवर कायदेशीर कडक कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन. – प्रा. अशोराज तायडेछत्रपतींचा अवमान सहन केला जाणार नाही, महायुतीसोबतचा पाठिंबा पुनर्विचारात – प्रजाशक्ती क्रांती दलाचा इशारा.

0
New-Doc-08-09-2025-07.09.jpg


आबिद शेख/ अमळनेर

जळगाव | ८ फेब्रुवारी २०२५
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांनी दिला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी “महाराज लाच देऊन आग्र्यावरून आले, अगदी औरंगजेबच्या वजिराला व त्याच्या पत्नीला सुद्धा लाच दिली” असा दावा करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप प्रा. तायडे यांनी केला. या विधानामुळे जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, हे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का देणारे असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रा. तायडे यांनी मुख्यमंत्री यांना मागणी केली की, या विधानामागील “बोलवता धनी” कोण आहे, याचा तपास व्हावा. तसेच सोलापूरकर यांचे पोलीस संरक्षण तातडीने काढून घेऊन, त्यांना बालिश विधान केल्याबद्दल बालसुधार गृहात पाठवावे.

महायुती सरकारच्या स्थापनेत प्रजाशक्ती क्रांती दलाने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगून, प्रा. तायडे यांनी इशारा दिला की, “जर कारवाई झाली नाही तर आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीसोबत राहायचे की नाही, याचा विचार करावा लागेल.”

या मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकारी जळगाव यांना प्रजाशक्ती क्रांती दलाकडून देण्यात आले. निवेदन कर्ते ऍड. सतीश आर. मोरे, राष्ट्रीय सचिव, प्रजाशक्ती क्रांती दल


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed