पाडळसरे धरणामुळे बोहरे गावाला बुडीत जाहीर करा; अन्यथा 15 ऑगस्टला जलसमाधीचा इशारा..

0
New-Doc-07-20-2025-23.26.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील तापी, बोरी आणि अनेर नदीच्या संगमावर वसलेले बोहरे गाव पाडळसरे धरण प्रकल्पामुळे पूर्णपणे बुडीत जाणार असल्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोहरे ग्रामस्थांनी आमदार अनिलदादा पाटील यांना सविस्तर निवेदन देत गाव पूर्णतः बाधित जाहीर करून पुनर्वसनाची मागणी केली आहे. मागण्या न मानल्यास 15 ऑगस्ट 2025 रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
ग्रामस्थांची प्रमुख मागणी

  1. बोहरे गाव पूर्णतः बाधित जाहीर करून पुनर्वसन तातडीने करावे.
  2. गेल्या दोन वर्षांपासून नाशिक विभागीय पातळीवर प्रलंबित असलेला शेतजमिनीच्या मोबदल्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा.
  3. पाडळसरे धरणामुळे अमळनेर, चोपडा, धरणगाव, जळगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर भागाला मोठा फायदा होणार आहे. मात्र, बोहरे गावकऱ्यांचे जीवन अंधारात ढकलले जात आहे.

2005-2006 मध्ये धरणाचा पाया टाकण्यापूर्वीच अतिवृष्टीमुळे बोहरे गाव पूरग्रस्त झाले होते. त्या वेळी लोकांना उंच माळरानावर स्थलांतरित व्हावे लागले होते.

टप्पा एकात 10.40 टीएमसी व टप्पा दोनमध्ये 17.01 टीएमसी पाणी साठवले जाणार असल्याने बोहरे गाव शंभर टक्के बुडणार आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे.

डांगरी गाव बोहरे गावापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असून ते पूर्ण पुनर्वसित होत आहे; मात्र बोहरे गावाबाबत अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की –
✔️ मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण,
✔️ भारतीय नागरिकत्व, रेशनकार्ड, मतदान यांचा बहिष्कार,
✔️ आणि शेवटचा उपाय म्हणून 15 ऑगस्ट 2025 रोजी जलसमाधी घेण्यात येईल.
आमदारांवर विश्वास, पण अन्याय नको

“पाडळसरे धरणाचे काम पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले तसेच बोहरे गावाच्या पुनर्वसनासाठीही आपणच न्याय द्याल, असा आम्हाला विश्वास आहे. मात्र आमच्या मागण्या न मानल्यास होणाऱ्या आर्थिक व जीवितहानीची जबाबदारी प्रशासन व लोकप्रतिनिधींवरच राहील,” असा इशारा बोहरे ग्रामस्थांनी दिला आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed