तब्लीगी जमात प्रकरणात ७० मुस्लिमांची निर्दोष सुटका..

0
New-Doc-07-18-2025-11.56.jpg

24 प्राईम न्यूज 18 Jul 2025

दिल्ली – मार्च २०२० मध्ये देशव्यापी लॉकडाऊनदरम्यान परदेशी तब्लीगी जमात सदस्यांना घरामध्ये आश्रय दिल्याचा आणि कोरोनाचा प्रसार केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात देशातील ७० मुस्लिमांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

१७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निकालात न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्या विरोधात दाखल केलेले सर्व खटले रद्द केले. यामुळे संबंधितांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता मिळाली आहे.

कोविडकाळात तब्लीगी जमातशी संबंधित अनेक प्रकरणे देशभरात दाखल झाली होती. मात्र न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणातील सर्व आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed