संजय गांधी निराधार अनुदान व इतर शासकीय योजनांचे थकीत मानधन तात्काळ वितरीत करावे – तहसीलदारांना निवेदन..

0
New-Doc-07-18-2025-06.43.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील दिव्यांग, विधवा महिला, वयोवृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत.

या संदर्भात मनोज मुख्खा मोरे (सामाजिक कार्यकर्ता) आणि रियाज शेख मौलाना, अध्यक्ष – स्वतंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी (रहे.) स्टडी सेंटर व पब्लिक, यांनी तहसीलदार, तहसील कार्यालय, अमळनेर यांना निवेदन दिले.

निवेदनात नमूद करण्यात आले की, लाभार्थ्यांचे केवायसी व आधार लिंक न झाल्याने मानधन बँक खात्यात जमा होत नाही. यामुळे लाभार्थी रोज तहसील कार्यालयात चौकशीसाठी गर्दी करत असतात; मात्र संबंधित विभागाकडून योग्य ती माहिती मिळत नसल्याने त्यांचे दैनंदिन जीवन संकटात आले आहे.

लाभार्थ्यांचे थकीत व नियमित मानधन लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे तसेच याबाबत माहिती दर्शविणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed