बोहरा गाव पुनर्वसनासाठी मोर्चा : १५ ऑगस्टला जलसमाधीचा इशारा..
आबिद शेख/अमळनेर. मोर्चात महिलांसह शेकडो गावकऱ्यांचा सहभाग


छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा प्रबुद्ध कॉलनी, कोर्ट रोड, विश्रामगृह मार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर दाखल झाला. हातात पुनर्वसनाच्या मागण्यांचे फलक घेत, घोषणा देत आलेल्या मोर्चात शेकडो महिला व पुरुष गावकऱ्यांचा सहभाग होता. तहसील कार्यालयाच्या आवारात पोलीसांनी मोर्चा रोखला.

निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा
नायब तहसीलदार अजय कुलकर्णी यांना निवेदन देताना गावकऱ्यांच्यावतीने सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी रुपचंद बागुल, सामाजिक कार्यकर्ते सुनिल अहिरराव, सरपंच सुधीर विश्वास पाटील, प्रभाकर शेषराव विंचुरकर, निखिल धनगर, जयेश बागुल, दिपक धनगर, दगडू पाटील, रविंद्र मालचे, कैलास रोकडे यांनी गावाच्या पूर्णतः पुनर्वसनाची तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सर्व गावकरी जलसमाधी घेतील, याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा दिला.
या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने सक्रीय पाठिंबा दिला होता. समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, चेअरमन पंकज मुंदडे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला.
आ. अनिल पाटील यांच्या घरीही मोर्चा
यानंतर मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयाहून आ. अनिल पाटील यांच्या घरी गेला. येथे माजी जि.प. सदस्या सौ. जयश्री पाटील यांनी मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून सकारात्मक प्रतिसाद दिला. तदनंतर मोर्चाने निम्न तापी प्रकल्प कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
बोहरा गाव पूर्णतः बाधित असूनही पुनर्वसन बाकी – ग्रामस्थ ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात,२००५-०६ मध्ये संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा बसल्याचे नमूद केले आहे २०१९ पासून वारंवार निवेदन देऊनही गाव “पूर्णतः बाधित” घोषित झाले नाही, तर पाडळसरे, धुपे, सात्री, डांगरी या गावांचे पुनर्वसन व नुकसानभरपाई झाली.
२६ मार्च २०२५ रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी गाव भेट देऊन हाय फ्लड तपासणी, माती परीक्षण, संरचनात्मक ऑडिटचे आदेश दिले होते, मात्र तीन महिने उलटले तरी कार्यवाही झाली नाही.
गावकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, तातडीने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू न केल्यास स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलन अपरिहार्य ठरेल.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
