बोहरा गाव पुनर्वसनाची मागणी तीव्र; १५ ऑगस्टला जलसमाधीचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) – निम्न तापी प्रकल्पाअंतर्गत तीव्र पूरप्रवण आणि पूर्णतः बाधित असलेले बोहरा गाव “अंशतः बाधित” दाखवून प्रशासनाने अन्याय केल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी अमळनेर येथे भव्य मोर्चा काढला. पुनर्वसनाची तातडीने कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी तापी-बोरी संगमावर जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरुवात झालेल्या या मोर्चात शेकडो महिला-पुरुष गावकरी सहभागी झाले होते. हातात पुनर्वसनाच्या मागण्यांचे फलक घेऊन प्रबुद्ध कॉलनी, कोर्ट रोड, विश्रामगृह मार्गे घोषणाबाजी करत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचला. पोलिसांनी तहसील कार्यालय आवारात मोर्चा अडवला.

नायब तहसीलदार अजय कुलकर्णी यांना निवेदन देताना सेवानिवृत्त अधिकारी शिवाजी बागुल, सामाजिक कार्यकर्ते सुनिल अहिरराव, सरपंच सुधीर पाटील, सुभाष चौधरी (पाडळसरे धरण जनआंदोलन समिती), तसेच रणजित शिंदे, पंकज मुंदडे, रामराव पवार यांच्यासह गावक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed