डांगर येथून ३३ वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांत हरवल्याची नोंद..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर तालुक्यातील डांगर गावात ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

६ जुलै रोजी ही महिला तिचा पती शेतात असताना घरातून कुठे तरी निघून गेली. पती घरी आल्यानंतर पत्नी घरात नसल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोध घेतल्यानंतर ती न सापडल्याने त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.
या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.
