राष्ट्र सेवा दल अध्यक्ष अजित शिंदे यांची साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला प्रेरणादायी भेट
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : राष्ट्र सेवा दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित शिंदे यांनी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट देत तेथील कार्याचा आढावा घेतला. “या वटवृक्षाप्रमाणे तरुणाईला सावली देऊन काम करण्यासाठी प्रेरणा देणार,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

कर्मभूमी स्मारक हे खान्देशाचे बलस्थान म्हणून ओळखले जाते. या कार्यास अधिक गती देण्यासाठी आणि तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना दिशा देण्याचे आश्वासन मा. शिंदे सरांनी दिले.
पाहुण्यांचे स्वागत प्रा. अरविंद सराफ, शुभम पवार, चेतन सोनार, मिलिंद वैद्य आणि स्थानिक तरुणांनी केले. गोपाळ नेवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.
धुळे येथील राष्ट्र सेवा दल सहकारी आणि राष्ट्रीय अध्यक्षांसह आलेल्या सहकाऱ्यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी, शिव निकम, हेमंत साळुंखे, नाविण्य पाटील, प्रथमेश चौधरी, अभय वाघमोडे, विक्रांत शेजवल, तुषार पाटील, आश्विनी वाघमोडे यांनी गुलाब फुल व पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशवी देऊन केले.
मा. अजित शिंदे सरांनी स्मारकावर आतापर्यंत झालेले कार्य समजून घेतले आणि एक वडाचे झाड लावून पर्यावरणस्नेही संदेश दिला.
कार्यक्रमास स्मारकाचे कृतीशील सहकारी, हितचिंतक, पालक, पाठीराखे, पदाधिकारी आणि विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
