साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनसीसी ‘ए’ प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश!
आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर – अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी 49 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अमळनेर अंतर्गत घेण्यात आलेल्या एनसीसी ‘ए’ प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 26 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील 20 विद्यार्थी ‘ए’ श्रेणीत तर 6 विद्यार्थी ‘बी’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे एनसीसी ऑफिसर श्री. समाधान पाटील यांचे अभ्यासू व प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
या गौरवशाली यशाबद्दल अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. हेमकांत पाटील, सचिव श्री. संदीप घोरपडे तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
