“उदय नगर” हे नाव एका कार्यकर्तृत्वाचे स्मारक – आमदार अनिल पाटील..

0
New-Doc-07-08-2025-22.16.jpg

आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर तालुक्यातील डांगर (ता. अमळनेर) या गावाचे नाव बदलून आता अधिकृतपणे “उदय नगर” असे ठेवण्यात आले आहे. हा निर्णय गावाचा गौरव तर आहेच, पण त्याहून अधिक एक असामान्य कार्यकर्त्याच्या स्मृतीला वाहिलेली कृतज्ञतेची शाश्वत मानवंदना आहे, असे मत मा. मंत्री अनिल भाईदास पाटील (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभाग) यांनी व्यक्त केले.

“गौरवाचा, कृतज्ञतेचा आणि स्मृतींचा अत्यंत भावनिक क्षण आहे. स्वर्गीय उदयबापू वाघ यांचे गावाशी असलेले नाते, समाजासाठी त्यांचे समर्पित कार्य, आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणादायी गाथा – यास महाराष्ट्र शासनाने नामकरणाद्वारे सन्मान दिला आहे,” असे आमदार पाटील यांनी म्हटले.

“उदय नगर” हे नाव केवळ एका गावाचे प्रतिनिधित्व करणार नाही, तर ते एका समाजसेवकाच्या अजरामर कार्याचा स्मारक ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाबद्दल त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed