डांगर बु गावाचे ‘उदयनगर’ नामकरण अखेर मंजूर – खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील डांगर बु या गावाला अखेर ‘उदयनगर’ या नावाची अधिकृत ओळख मिळाली आहे. केंद्र शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ मे २०२५ रोजी राजपत्रात ‘उदयनगर’ हे नाव जाहीर केले असून, यामुळे गावाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांनी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत ही प्रक्रिया पूर्णत्वास नेली. नामांतर ही केवळ औपचारिक बाब नसून, गावकऱ्यांच्या भावना, अस्मिता आणि स्वाभिमानाचे प्रतीक ठरली आहे.
गृह विभाग, दिल्लीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रालय मुंबईच्या सामान्य प्रशासन विभागाने या निर्णयाला अंतिम स्वरूप दिले. गावाच्या नामांतराची बातमी समजताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. गावकऱ्यांनी फटाके, मिठाई, पुष्पगुच्छ, ढोल-ताशांच्या गजरात खासदार वाघ यांचे भव्य स्वागत केले.
खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या, “हे केवळ नाव बदलण्याचे नव्हे, तर गावाच्या ओळखीला नवा अर्थ देणारे पाऊल आहे. ‘उदयनगर’ ही संज्ञा गावाच्या विकास आणि वैभवाचा नवा अध्याय ठरेल, असा मला विश्वास आहे.”
‘उदयनगर’ हे नाव भविष्यात प्रगतीशीलतेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
