“ऑपरेशन सिंदूर” नंतर अमळनेरमध्ये राष्ट्रप्रेमाने भारलेली ‘भव्य तिरंगा रॅली’

0
New-Doc-05-18-2025-07.01.jpg

आबिद शेख/अमळनेर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला असून, त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर जोरदार कारवाई केली. या शौर्यपूर्ण कृतीमुळे भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना दाटून आली आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने भारतीय लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ‘भव्य तिरंगा रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्या राष्ट्रप्रेमाची भावना प्रकट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • दिनांक: १९ मे २०२५ (रविवार)
  • वेळ: सकाळी ७.०० वाजता
  • सुरुवात ठिकाण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमळनेर
  • समारोप ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, अमळनेर

अमळनेरकर नागरिकांनी एकजुटीने या रॅलीत सहभागी होऊन भारतीय लष्कराला अभिवादन करावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात येत आहे.

आपले विनीत,
समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed