“लोकशाही दिन 19 मे रोजी अमळनेर मध्ये – नागरिकांच्या तक्रारींवर थेट सुनावणी”

0
New-Doc-05-18-2025-06.51.jpg

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने, दिनांक 19 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या दिवशी अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून, नागरिकांना आपल्या अडचणी व तक्रारी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. या लोकशाही दिनात महसूलविषयक अडचणी, जमीन व मालमत्तेसंदर्भातील तक्रारी, शासकीय सामाजिक योजना, सरकारी सेवा व सुविधांशी संबंधित विविध अडचणींच्या संदर्भात संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरीत कार्यवाही केली जाणार आहे.

नागरिकांनी आपापल्या तक्रारी संबंधित पुराव्यांसह 19 मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर व तहसिलदार अमळनेर श्री. रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

लोकशाही दिन म्हणजे शासनाशी थेट संवाद साधण्याची अनमोल संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या समस्या मांडून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed