‘शक्ती’ चक्रीवादळाचा तडाखा: मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, जोरदार पावसाचा इशारा..
24 प्राईम न्यूज 17 May 2025

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल होणार असून भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात मुसळधार पाऊस, ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणारे वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशात तीव्र पावसाच्या स्वरूपात दिसून येणार आहे, तर महाराष्ट्रात पूर्वमोसमी वारे आणि वादळी पावसाचा जोर जाणवणार आहे. रायगड जिल्ह्यात १८ मेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये आधीच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
राज्यात पुढील तीन ते चार आठवडे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून, हा पाऊस मान्सूनच्या आगमनापर्यंत कायम राहू शकतो. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
