रेल्वे अपघातस्थळी रोटरी क्लब अमळनेरतर्फे पाणी व ज्यूस वाटप – रेल्वे अधिकाऱ्यांकडून कौतुक..

0
New-Doc-05-16-2025-20.03.jpg


आबिद शेख/अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर:रेल्वे अपघातानंतर कार्यरत असलेल्या आपत्कालीन यंत्रणांच्या मदतीसाठी रोटरी क्लब अमळनेरने सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. काल व आज, दोन दिवसांत क्लबतर्फे अपघातस्थळी कार्यरत ४०० ते ५०० कामगारांना पिण्याचे पाणी व कैरी पन्ना (ज्यूस) वाटप करण्यात आले.

या कामगारांकडून रेल्वे रुळ, सिग्नल व्यवस्था तसेच उच्च दाब वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम अहोरात्र सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना दिलासा देणारे हे योगदान मोलाचे ठरले.

वाटपाच्या वेळी पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, आपत्तीच्या प्रसंगी समाजासाठी उभे राहण्याच्या क्लबच्या भूमिकेचे अभिनंदन केले.

या उपक्रमात क्लबचे अध्यक्ष रोटेरियन ताहा बुकवाला यांच्यासह रोटेरियन प्रितपाल सिंग बग्गा, रोटेरियन देवेंद्र कोठारी, रोटेरियन कीर्ती कुमार कोठारी, रोटेरियन आशीष चौधरी, रोटेरियन रोहित सिंघवी यांच्यासह सर्व सभासदांनी सहभाग घेतला.

रोटरी क्लब अमळनेरने नेहमीच “सेवा परमो धर्मः” या तत्त्वाशी निष्ठा राखून समाजोपयोगी कार्यात आपली भूमिका बजावली आहे, आणि याही संकटाच्या काळात समाजासोबत खंबीरपणे उभा राहून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed