शहरात सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश; संत सखाराम महाराज पालखीचे अंदरपुरा ट्रस्टतर्फे स्वागत..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
अमळनेर | शहरात दरवर्षी उत्साहात साजरा होणाऱ्या संत सखाराम महाराज पालखी सोहळ्याचे यंदा बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.

शहरातील सराफ बाजारजवळील ईलाही मस्जिद परिसरात पालखीचे आगमन झाल्यानंतर, श्री प्रसाद महाराज यांचा पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार ट्रस्टचे उपाध्यक्ष आरिफ हाजी सत्तार मेमन यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी पंच कमिटीचे सदस्य अशफाक बशीरोदीन शेख, अहेतेशाम खान पठाण, मजहर शेख, रौनक सर, जाविद पेंटर यांच्यासह अनेक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
