हॉकी जळगावचे वर्षा सोनवणे व इम्रान बिस्मिल्ला यांचा लेवल टू अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण..

0
New-Doc-05-14-2025-22.19.jpg


24 प्राईम न्यूज 14 May 2025

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 980/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **


पुणे येथे हॉकी महाराष्ट्र व हॉकी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे ७ ते ९ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हॉकी झोनल लेवल टू या विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमात जळगाव जिल्ह्यातील खेळाडू वर्षा सोनवणे व इम्रान बिस्मिल्ला यांनी यशस्वी सहभाग नोंदवला. या दोघांची निवड पूर्वीच्या कामगिरीच्या आधारे करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मागील वर्षी या दोघांनी लेवल वन अभ्यासक्रमही यशस्वीरीत्या पूर्ण केला होता.

एक वेळेस आवश्य भेट द्या

या अभ्यासक्रमात आंतरराष्ट्रीय पंच तसेच खेळाडू रिपुदमन (आयएएस), फहीम खान व दीपक जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
वर्षा व इम्रान यांच्या या यशाबद्दल हॉकी जळगाव तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, प्रशिक्षिका हिमाली बोरोले, ममता प्रजापत, भावना कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed