श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री यात्रोत्सव…

0
IMG-20230213-WA0057(1)

एरंडोल (प्रतिनिधि)श्री.क्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथिल प्राचीन शिव मंदिरात 2 दिवशीय महाशिवरात्री यात्रोत्सव साजरा होणार असून त्यात पुढील प्रमाणे कार्यक्रम होतील. दि.18।2।2023 शनिवार रोजी सकाळी शिवाभिषेक व विविध देवता पूजन…10 ते 12 श्री फकिरा महाजन रिंगणगाव व श्री नामदेव आधार महाजन सरपंच,रवणजे यांचेकडून फराळ.दुपारी 2 ते 4 ह.भ.प.शिवाजी महाराज, पष्टाणेकर यांचे संकीर्तन 5 ते 6 हरिपाठ संध्याकाळी श्री प्रेमराज अवचित माळी,खर्चीकर (विश्वस्त श्री सुकेश्वर देवस्थान) यांचेकडून फराळ.रात्री 9 ते 11 श्री.ह.भ.प.सखाराम महाराज, कजगाव कर यांचे संकीर्तन. दि.19।2।2023 रविवार रोजी सकाळी 9 ते 11 श्री ह भ प विजय महाराज भामरे यांचे काल्याचे संकीर्तन. 11 ते 1 श्री प्रकाश लोटन रोकडे ( विश्वस्त ,श्री सुकेश्वर देवस्थान ) यांचेकडून महाप्रसाद. या कार्यक्रमात श्री ह भ प योगेश महाराज, हनुमंतखेडे ,श्री ह भ प धनंजय महाराज,मृदुन्गचार्य जळगांव कर तसेच पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळे, ह भ प कीर्तनकार, गायनाचार्य ,वारकरी, महिला मंडळी उपस्थित राहनार आहेत.तरी भाविकांनी मोठ्या संख्येने येऊन यात्रोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री.विजय नामदेव भामरे अध्यक्ष, व सचिव श्री.समाधान पुंडलिक कोळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed