आदिशक्ती एकवीरादेवी मंदिर परिसराचा विकास कामांचा आ. फारूक शाह यांचे हस्ते शुभारंभ…

0
IMG-20230213-WA0037.jpg

धुळे (अनिस अहेमद ) प्रादेशिक पर्यटन विकास योजना २०२१-२२ अंतर्गत धुळे जिल्ह्यातील ‘ऐतिहासिक पुरातन एकविरा देवी मंदिरासाठी पर्यटन विभाग शासननिर्णय दि. २३-०२-२२ नुसार ३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. यात प्रामुख्याने सभामंडप दुरुस्ती करणे, भक्त निवास दुरुस्ती करणे व मंदीर परिसरातील इतर अनुषंगिक कामांचा समावेश आहे. आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते आज रोजी एकविरा देवी मंदिर परिसरातील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला


सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ताबद्दल झाल्यानंतर मा.मुख्य सचिव यांचे दि. १८/०७/२०२२ च्या निदेशानुसार १/०४/२०२१ पासून मंजुर केलेल्या परंतु निविदा न काढलेल्या तसेच कार्यादेश दिलेत मात्र काम सुरु न झालेल्या कामाच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही करू नये अशा सूचना दि. २५/०७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती. आदिशक्ती एकविरा देवी खान्देश वासियांचे कुलदैवत असल्याने मंदीर परिसराचा विकास होणे आवश्यक आहे हि बाब लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी दि.१४/११/२०२२ रोजी मुख्यमंत्री महोदयांना प्रत्यक्ष भेटून स्थगिती उठविणेची मागणी केली. त्यानुसार पर्यटन विभागाने दि. १६/१२/२०२२ रोजी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांबद्दल स्थगिती उठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केल्या जाणान्या या कामात सभामंडप दुरुस्ती, भक्तनिवास दुरुस्ती, व इतर कामांचा समावेश आहे. व पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी एकविरा देवी मंदीर परिसरातील विकास कामांची स्थगिती उठविली त्याबद्दल आ. फारुख शाह यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांचे आभार मानले आहे.यावेळी कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील,उपअभियंता झालटे,नासिर पठाण,गनी डॉलर, दीपश्री नाईक,मंगला मोरे,आसिफ शाह,रफिक शाह,साबीर सैय्यद,धनराज विभांडीक,अर्जुन बडगुजर ,अड.निलेश पाठक,प्रदीप गुरुजी,चतुर देवरे,दौलत पवार,अमृत कुवर,राजेश चत्रे ,बादल जुगलकर,राजु चौधरी,saakib शाहविक्रम फुलपगारे,महेंद्र फुलपगारे,निसार अन्सारी विश्वनाथ ढोले.पंकज गिरासे,विठ्ठल वाघ, जगन माळी,बापू खालाने, चंद्रकांत जाधव,गजानन सोनार,बाबाजी पाटील,पौर्णिमा चौधरी, शारदा पाटील,लीलाबाई सैंदाने,प्रीती भावसार,रेखा चौधरी,सुलभा चौधरी,रेखा गायकवाड,ज्योती भावसार,, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed