जवखेडे खुर्द येथे शेतमजुराचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू…
एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे सुदर्शन बळीराम धनगर वय तीस वर्ष या शेतमजुराने विषारी द्रव्य सेवन करून आपली जीवन यात्रा संपवली ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मृत व्यक्तीच्या राहत्या घरात घडली याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीकडे तीन भिगे शेती असून मोल मजुरी करून तो कुटुंबाची गुजरान करीत असे दरम्यान त्याने विष सेवन केल्याचे आढळून आल्याने त्याला एरंडोल येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अनंती त्याला मृत घोषित करण्यात आले बुधा धनगर यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहे पत्नी व दोन मुले आहेत. कर्जबाजारीपणामुळे त्यांने आत्महत्या केली असावी असा सूर ग्रामस्थांच्या चर्चेतून ऐकवयास मिळाला..
