10 वर्षांपासून फरार आरोपी इंदूर हून ताब्यात घेऊन अटक…
10 वर्षांपासून पोलिसांना पाहिजे असलेल्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातुन ताब्यात घेतले आहे, 10 ऑक्टोबर 2013 रोजी रोजी आरोपी कालू उर्फ विशाल दुर्गादास जाधव याने मनोज पाटील यास जुने बस स्थानक भागात वस्तराने कंठावर, मांडीवर वार करून गंभीर दुखापत केली होती, तेंव्हा पासून तो फरार होता, वेळोवेळी अमळनेर पोलीस त्याचा शोध घेत होते, विद्यमान पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना सदर आरोपी इंदूर मध्ये राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली, त्या माहिती वरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस नाईक मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, यांच्या पथकास इंदूर येथे पाठवले पथकाने 11 फेब्रुवारी रात्री त्यास इंदूर हुन ताब्यात घेत अटक केली ,पाठकाचे पी आय शिंदे यांनी कौतुक केले..
