हनुमान जन्मोत्सव निमित्त हनुमान नगर नामस्मारकाचे भव्य उद्घाटन! -सौ. स्वप्ना पाटील व विक्रांत भास्करराव पाटील (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते संपन्न..

0
New-Doc-04-13-2025-14.11.jpg


आबिद शेख/अमळनेर

[अमळनेर] — शहरातील वडचौक परिसरातील सुप्रसिद्ध हनुमान नगर भागातील उत्साही तरुणांनी एकत्र येत, श्री मारुतीरायांचे आकर्षक व प्रेरणादायी स्मारक उभारून हनुमान नगर नामस्मारकाची निर्मिती केली आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या भव्य स्मारकाचे उद्घाटन सौ. स्वप्ना पाटील व विक्रांत भास्करराव पाटील (माजी नगरसेवक) यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी दोघांनाही सपत्नीक मान-सन्मान व सत्कार करण्यात आला. स्मारकाच्या निर्मितीसाठी विशेष मेहनत घेतलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी जल्लोषात उद्घाटन सोहळा पार पाडला. या प्रसंगी भव्य कीर्तनाचे आयोजनही करण्यात आले होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. या विधायक उपक्रमाबद्दल आयोजकांचे व तरुण कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed