महात्मा फुले यांची १९८ वी जयंती उत्साहात साजरी — -समता परिषदेच्या पुढाकाराने अभिवादन कार्यक्रम..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या १९८व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, शेतकरी, वंचित व मागास घटकांसाठी लढा उभारणारे, भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करणारे थोर समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांची स्मृती जागवण्यात आली.
या वेळी समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव महाजन, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन सर, क्रांतीज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा विमलबाई हिमत महाजन, माजी उपनगराध्यक्ष रामदास शेलकर, पांडुरंग महाजन, डॉ. योगेश महाजन सर, महेंद्र महाजन (कुबेर ग्रुप), कैलास गजानन महाराज, तुळशीराम महाजन, प्रा. प्रकाश महाजन, प्रवीण बारकू, कैलास महाजन, गणेश महाजन, नरेश महाजन, राजेंद्र महाजन, हेमंत महाजन, ईश्वर चौधरी, जितेंद्र महाजन, चित्रकला प्रकाश महाजन, मनिषा, अर्चना, रंजना, भारती महाजन यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांप्रती नवचैतन्य निर्माण केल्याचे जाणवले.
