शहआलम नगरमध्ये अखेर व्हालचा खड्डा दुरुस्त; ‘प्राईम न्यूज’च्या बातमीची दखल घेत प्रशासनाची कारवाई..
आबिद शेख/अमळनेर
शहआलम नगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत होते. शाळकरी विद्यार्थी आणि वाहनचालकांना या समस्येमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्य वेळोवेळी प्राईम न्यूज ला ह्या बाबत तक्रारी आल्या होत्या
मात्र, ‘प्राईम न्यूज’ने ही गंभीर समस्या अधोरेखित करताच प्रशासनाने तत्काळ कारवाई केली. नगरपालिकेने तातडीने खड्डा दुरुस्त केला असून, या कामी इंजिनियर बैसाने साहेबांचे विशेष सहकार्य लाभले.
स्थानिक नागरिकांनी ‘प्राईम न्यूज’च्या तत्पर पत्रकारितेचे आणि प्रशासनाच्या वेगवान कृतीचे आभार मानले. आता या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचा दिलासा मिळाला आहे.
